‘एक देश एक निवडणूक’ जेपीसीची मंगळवारी बैठक

0

नवी दिल्ली : ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ विषयावरील संयुक्त संसदीय समितीची (जेपीसी) उद्या, मंगळवारी सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत बैठक होणार आहे. यापूर्वी २५ मार्च रोजी यासंदर्भात बैठक झाली होती. एक देश, एक निवडणूक’ विषयावरील ‘जेपीसी’ बैठकीच्‍या पहिल्‍या सत्रात सर्वोच्‍च न्‍यायालयातील निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांच्याशी संवाद साधला जाईल. जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती एसएन झा यांच्याशी चर्चा केली जाईल. पुढील सत्रात सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि भारताच्या २१ व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष डॉ. न्यायमूर्ती बीएस चौहान तर शेवटच्‍या सत्रात राज्यसभा सदस्य आणि ज्येष्ठ वकील डॉ. अभिषेक मनु सिंघवी यांच्‍याशी जेपीसी चर्चा करणार आहे.

‘एक राष्ट्र, एक निवडणूक’वरील ‘जेपीसी’ वेबसाइटच्या अनावरणाबद्दल बोलताना जेपीसेचे अध्यक्ष पीपी चौधरी म्‍हणाले की, “समितीने दोन प्रमुखबाबींवर निर्णय घेतले आहेत. यासंदर्भातील जाहिरात वेबसाईटवर सर्व भाषांमध्ये छापली जाणार आहे. या माध्‍यमातून सर्वांचे मते जाणणे शक्‍य होणार आहे. क्यूआर कोड सुविधेसह वेबसाइट लवकरच लाँच केली जाईल. सूचना गोळा केल्या जातील. या सूचनांचा खासदार आढावा घेणार आहेत. त्यासोबतच संयुक्त संसदीय समिती सर्व राज्यांना भेट देणार आहे. ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ यावर सर्व राज्‍यांची मते जाणून घेणार आहे. पहिला दौरा महाराष्‍ट्र राज्‍याचा केला जाणार आहे. मे महिन्यात उत्तराखंड दौर्‍याचे नियोजन आहे. जम्मू आणि काश्मीर, पंजाब आणि हरियाणा येथे जूनमध्ये दौरा होईल. यानंतर अन्‍य राज्‍यांच्‍या दौर्‍याचे नियोजन केले जाणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech