गणेशोत्सवात “शोध महाराष्ट्राच्या रत्नांचा” या अनोख्या स्पर्धेचे आयोजन

0

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या तर्फे महाराष्ट्राचा सुखकर्ता व Reel To रिअल महाराष्ट्र या रील स्पर्धेचे आयोजन

मुंबई – शिवसेना युवासेनाच्या वतीने गेली अनेक वर्षपासून मुंबई, ठाणे येथे गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात येत होते. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या वतीने ही स्पर्धा मुंबई, ठाणे मर्यादित न राहता संपूर्ण राज्यात केली जात आहे. राज्यस्तरीय गणपती स्पर्धेचे आयोजन युवासेनेच्या वतीने करण्यात येत असून यामध्ये ही स्पर्धा ८ विभागात विभागली गेली आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, अमरावती, नागपूर अशा ८ विभागात ही स्पर्धा होणार आहे.

गणेशोत्सव मंडळांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी yuvasenaofc.in या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. प्रत्येक विभागात बक्षिसे दिली जाणार आहेत. प्रथम पारितोषिक ५ लाख व आकर्षक ट्रॉफी, द्वितीय पारितोषिक ३ लाख व आकर्षक ट्रॉफी, तृतीय पारितोषिक २ लाख व आकर्षक ट्रॉफी, व चौथे पारितोषिक १ लाख व आकर्षक ट्रॉफी दिली जाणार आहे. तसेच प्रत्येक विभागात २५ मंडळांना २५ हजाराचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच एका विभागात १७ लाख २५ हजारांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.८ विभागांचा समावेश करुन घेतला तर १ कोटी ३८ लाखांचे पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबई येथील चर्नीरोड येथे या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्री महोदय यांनी युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केल्याबद्दल पुर्वेश सरनाईक यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री आणि महायुती सरकारने हिंदू सणावरील बंदी ही पूर्ण उठवली आहे. गणपती उत्सव हा मुंबई, ठाणे मर्यादित न राहता संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हावा या दृष्टीकोनातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे असे पुर्वेश सरनाईक यांनी सांगितले.

शिवसेनेच्या वतीने “शोध महाराष्ट्राच्या रत्नांचा” या स्पर्धेचा शुभारंभ मुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १ सप्टेंबर रोजी करण्यात आला. यात महाराष्ट्राचा सुखकर्ता राज्यस्तरीय गणपती सजावट स्पर्धा आणि Reel To Real महाराष्ट्र राज्यस्तरीय रील स्पर्धेची घोषणा मुख्यमंत्री महोदयांनी केली. Reel To Real महाराष्ट्र ही राज्यस्तरीय रील स्पर्धा ८ विभागात होईल. पहिले पारितोषिक १ लाख व आयफोन, द्वितीय पारितोषिक ७५ हजार व आकर्षक ट्रॉफी, तृतीय पारितोषिक ५० हजार व आकर्षक ट्रॉफी, चौथे पारितोषिक २५ हजार व आकर्षक ट्रॉफी आणि या बरोबर विजेत्यांना १० हजार व आकर्षक ट्रॉफी देण्यात येणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech