विमानात धुम्रपान करणाऱ्या प्रवाशाला अटक,सूरत-कोलकाता इंडिगो फ्लाईटमधील प्रकार

0

सूरत : गुजरातच्या सूरत येथून कोलकाता येथे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बिडी पिणार्या प्रवाशी फ्लाईटमधून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर या प्रवाशाला अटक करण्यात आली. हा प्रकार २७ मार्च रोजी घडल्याचे पोलिसांनी सांगितले. विमानप्रवासात काही आचारसंहिता पाळणे बंधनकारक असते. त्यापैकीच एक म्हणजे सार्वजनिक विमान प्रवासादरम्यान प्रवाशांना सिगारेट-बिडी पिता येत नाही. पण, सूरत-कोलकाता हे विमान दुपारी ४.३५ वाजता उड्डाण करण्यास तयार होते. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे विमानाला विलंब झाला.

सुमारे ५.३० वाजता, एअर होस्टेसला धुराचा वास आला आणि तिने तातडीने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. अधिकाऱ्यांनी तत्काळ तपासणी सुरू केली. यावेळी तपासणीत अशोक बिस्वास या प्रवाशाकडे बिडी आणि आगपेटी आढळून आली. बिस्वास १५-ए सीटवर बसलेला होता. अशोक बिस्वास याने विमान टेकऑफ करण्यापूर्वीच स्वच्छतागृहात बिडी ओढली. त्याच्यावर प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याप्रकरणी बीएनएसच्या कलम १२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

विमानतळावर कडक सुरक्षा तपासणी होऊनही बिश्वास बीडी आणि माचिस विमानात घेऊन जाण्यात यशस्वी झाला होता. तांत्रिक बिघाडामुळे विमान वेळेवर उड्डाण करू शकले नाही. याचदरम्यान, एअर होस्टेसला स्वच्छतागृहात धुराचा वास घेतला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली.बिश्वासला विमानातून उतरवण्यात आले. एअरलाईनने हा प्रकार पोलिसांना कळवला, त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. सध्या एअरलाईनकडून कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही, मात्र त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने अधिकृत तक्रार नोंदवली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech