ठाण्यात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने मोफत जयपूर फुट वाटप शिबिराचे यशस्वी संपन्न
ठाणे – धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांचे गोरगरीब जनतेसाठी असलेले सर्व क्षेत्रातील काम सर्वत्र ज्ञात आहे. गुरुंच्या शिकवणूकीवर महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे साहेब अविरत कार्यकर्ता या भूमिकेतून मार्गक्रमण करत आहेत. मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे साहेब व लोकप्रिय खा.डॉ.श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सध्या रुग्णसेवा करतो आहे. या वैद्यकीय सेवेसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षप्रमुख मंगेश चिवटे आणि सर्व टीम अथक आणि अविश्रांत मेहनत घेत आहेत.
आज शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, आरोग्यदूत फाउंडेशन आणि रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील दिव्यांग बांधवासाठी मोफत जयपूर पद्धतीचे हात,पाय वितरीत करण्याचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. मागील वर्षभरापासून हे आरोग्य शिबीर प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी आनंद आश्रमात ठेवण्यात येते. या या माध्यमातून १००० पेक्षा अधिक रुग्णांना आतापर्यंत मोफत जयपूर फुट ॲन्ड हॅन्ड वाटप करण्यात आले असून १० हजार रुग्णांना शारिरिक दृष्ट्या स्वावलंबी करण्याचे आमचे उद्दीष्ट आहे.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष हा मागील ८ वर्षांपासून सातत्याने रुग्णसेवेत कार्यरत आहे. आजवर या कक्षाने २५ हजारांपेक्षा अधिक शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात किंवा पूर्णपणे मोफत करवून दिलेल्या आहेत. जवळजवळ १२०० शिबीर या कक्षाने आजवर घेतले असून राज्यामध्ये रुग्णसेवेचा एक नवा विक्रम यांनी केलेला आहे.
आजपर्यंत कोणत्याही पक्षाने स्वतःची संघटना सोडून इतर सर्वसामान्य नागरिकांसाठी जात-धर्म-पंथ-पक्ष विरहीत अशी पूर्णवेळ वैद्यकीय सेवा करण्याची भूमिका घेतली नव्हती. परंतु शिवसेनेने ही भूमिका घेवून त्यासाठी नि: स्वार्थ रुग्णसेवकांची फौज देखील तयार केली. यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची स्वतंत्र कार्यालये आता झाली आहेत. या कार्यालयात रुग्ण येतात. रुग्णांचा आजार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना, धर्मादाय योजना, खाजगी ट्रस्टच्या माध्यमातून होणारी मदत किंवा बिलांमध्ये सवलत अशाप्रकारे सर्व स्तरावर पडताळणी करुन रुग्णांची समस्या दूर केली जाते. हे कार्य करण्यासाठी वैद्यकीय मदत कक्षाची राज्यातील सर्व कार्यालये २४ तास खुली असतात. राज्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे विनम्र आवाहन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.