डेहराडून – उत्तराखंडमध्ये गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस कोसळत आहे. केदारनाथ धामसह रुद्रप्रयाग जिल्हयात दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. १० केदारनाथ धाम येथे पावसाबरोबरच बर्फवृष्टी झाली. त्यामुळे केदारनाथ यात्रेच्या मार्गावरील रामपूर, सीतापूर, सोनप्रयाग अशा विविध ठिकाणी यात्रेकरून अडकून पडले. १० मेपासून केदारनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी उघडण्यात आल्यापासून या तिर्थस्थळावर यात्रेकरूची रीघ लागली आहे. दररोज सुमारे ३० हजार भाविक केदारनााथ धामवर येत असल्याने रामपूरपासून मोठी वाहतूक कोंडी होत आहे.पाऊस आणि बर्फवृष्टीही झाल्याने थंडीचा कडाकाही वाढला आहे. ऐन उन्हाळ्यात येथे हिवाळ्यासारखे वातावरण आहे.