“दहशतवाद्यांनी कल्पना केली नसेल अशी शिक्षा करू”- पंतप्रधान

0

मधुबनी : पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा पृथ्वीच्या शेवटच्या टोकापर्यंत माग काढून त्यांनी कल्पना केली नसेल अशी शिक्षा करू असा वज्रनिर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त आज, गुरुवारी बिहारच्या मधुबनी येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरण येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सार्वजनिकरित्या या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. या हल्ल्यात किमान २६ जणांचा मृत्यू झाला होता.

कार्यक्रमाच्या सुरुवातील पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करून पंतप्रधान म्हणाले की, देशाच्या शत्रुंनी केवळ केवळ निष्पाप पर्यटकांवर नव्हे, तर भारताच्या आत्म्यावरच हल्ला करण्याचे धाडस केले आहे. दहशतवाद्यांच्या हाती उरलेली थोडीफार जमीनसुद्धा आता हिरावून घेण्याची वेळ आली आहे बिहारच्या भूमीवरून आज, मी संपूर्ण जगाला सांगतो की भारत प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांच्या समर्थकांची ओळख पटवेल, त्यांना शोधून काढेल आणि शिक्षा देईल. आपण त्यांचा पृथ्वीच्या टोकापर्यंत पाठलाग करू. आपण त्यांचा शेवटपर्यंत पाठलाग करू. दहशतवादामुळे भारतीयत्वाचे स्पिरीट कधीही कमी होणार नाही. दहशतवादाला माफ केले जाणार नाही.

दहशतवाद्यांना शिक्षा देणारच. दहशतवादाचा बळी ठरलेल्यांना न्याय मिळावा यासाठी आवश्यक तो प्रयत्न केला जाईल. संपूर्ण देश या निर्धारात एकदिलाने उभा आहे. जे कोणी मानवतेवर विश्वास ठेवतात ते सर्व आपल्यासोबत आहेत. या कठीण काळात आमच्यासोबत उभे राहिलेल्या विविध देशांच्या नागरिकांचे आणि नेत्यांचे मी आभार मानतो असे मोदींनी सांगितले. मानवतेवर विश्वास ठेवणारे सर्व लोक आपल्यासोबत आहेत. या कठिण प्रसंगी आमच्यासोबत उभे राहिलेल्या विविध देशांच्या लोकांचे आणि नेत्यांचे आभार व्यक्त करतो असे मोदींनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech