नवी दिल्ली – ‘विकसित भारताकडे प्रवास: केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 नंतरची परिषद’ या दिनांक 30 जुलै, 2024 रोजी दुपारी 12 वाजता विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत.
ही परिषद भारतीय उद्योग परिसंघ (CII) द्वारे आयोजित केली जात असून याद्वारे उद्योगांच्या विकासासाठी सरकारने घेतलेल्या महत्वपूर्ण भूमिकेची रूपरेषा तसेच उद्योगांचा यातील सहभाग सादर करण्याचा या परिषदेचा उद्देश आहे.
उद्योग, सरकार, धोरणकर्ते, विचारमंच (थिंक टँक) आणि इतर असे सुमारे एक हजाराहून अधिक प्रतिनिधी सहभागी या परिषदेला वैयक्तिकरित्या उपस्थित राहतील तर अनेकजण देशभरातील आणि परदेशातील भारतीय उद्योग महासंघाच्या विविध केंद्रांमधून या परीषदेत सहभागी होतील.