आयटीबीपी दल शौर्य आणि समर्पणाचं प्रतिक – पंतप्रधान

0

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत तिबेट सीमा पोलीसदलाच्या स्थापनादिनानिमित्त आयटीबीपी हिमवीर आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारत-तिबेट सीमा पोलीस दल हे शौर्य आणि समर्पणाचं प्रतिक असल्याचे सांगत नैसर्गिक आपत्ती आणि बचावकार्यात या पोलीस दलाने केलेल्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. त्यांचं हे कार्य लोकांसाठी अभिमानास्पद असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

आपल्या एक्स वरील संदेशात पंतप्रधान लिहितात : “आयटीबीपी हिमवीर आणि त्यांच्या कुटुंबियांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा. हे दल शौर्य आणि समर्पण यांचं महान प्रतिक आहे. अतिशय दुर्गम प्रदेश आणि प्रतिकूल वातावरणात हे हिमवीर आपलं रक्षण करतात. याव्यतिरिक्त, नैसर्गिक आपत्ती आणि बचावकार्य दरम्यान त्यांचे प्रयत्न प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech