सेक्स रॅकेट प्रकरणात नाशिकमध्ये राजकीय नेत्याला अटक

0

नाशिक – हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट प्रकरणांमध्ये नाशिक पोलिसांनी रिपाई आठवले गटाच्या उत्तर महाराष्ट्र संघटक असलेल्या एका राजकीय नेत्याला अटक केल्याने सेक्स रॅकेटमध्ये आता राजकीय नेत्यांची भागीदारी असल्याचे समोर आले आहे. आडगाव परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने केला आहे. यामध्ये एका महिलेला आणि तिच्या साथीदाराला अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटप्रकरणी पोलिसांनी एका राजकीय नेत्याला अटक केली आहे. कुंटणखान्यामध्ये थेट राजकीय एनेत्यांची भागीदारी समोर आल्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. या कुंटखान्यात अजून काही राजकीय व्यक्तींचा समावेश आहे का याचा पोलीस शोध घेत आहे. त्यामुळे या हायप्रोफाईल सेम् चेकमेट न्यूज रॅकेटकडे नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्राच लक्ष लागले आहे.

या गुन्ह्याचा तपास करीत असताना संशयित महिला कविता साबळे हिच्या फ्लॅटमध्ये पवन क्षीरसागर हा देखील येऊन कुंटणखाना चालविण्यास मदत करीत असल्याचे काही साक्षीदारांनी पोलिसांना माहिती दिली होती. त्याअनुषंगाने तपास केला असता पवन बाळकृष्ण क्षीरसागर, ५४, रा. जेतवन नगर, शरणपूर, नाशिक याचा सहभाग असल्याचे उघड झाले. यावरून पोलिसांनी आरपीआय आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र संघटक पवन क्षीरसागर याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सोमवार ९ पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech