पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

0

नवी दिल्ली – अपंगत्वाच्या बनावट कागदपत्रांद्वारे आयएएस केडर मिळवणाऱ्या वादग्रस्त प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांचे पद रद्द करण्यात आले आहे. यूपीएससीने हा निर्णय घेतला होता. त्यानंतर पटियाला हाऊस कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज देखील फेटाळला. त्यामुळे पूजा खेडकर यांना कधीही अटक होऊ शकते. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

पूजा खेडकर यांच्या विरोधात यूपीएसीकडून बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्या प्रकरणी दिल्लीत गुन्हा दाखल होता. या प्रकरणात पूजा यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केले होते. प्रशिक्षणार्थी आयएएस म्हणून पूजा खेडकर या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत होत्या. मात्र, आपल्या गाडीला दिवा लावल्याने तसेच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्याच्या अँटी चेंबरमध्ये कार्यालय थाटल्याने वाद निर्माण झाला होता.

खेडकर यांच्या विषयीचा अहवाल जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी राज्य सरकारला पाठवला होता. त्यानंतर अपंगत्वाचे बनवाट कागदपत्र सादर करत यूपीएससीची फसवणूक करत पूजा यांनी आयएएस केडर मिळवल्याचे स्पष्ट झाले होते. नावात बदल करत पूजा यांनी तब्बल ११ वेळा यूपीएससीची परीक्षा दिली होती. याची दखल पूजा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर अटकपूर्व जामीनासाठी पूजा यांनी पटियाला कोर्टात धाव घेतली होती. मात्र, कोर्टाने पूजा यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला.

पात्र नसताना चुकीच्या पद्धतीने त्यांनी सूट मिळवली, अशा लोकांचा शोध घेण्यासही कोर्टाने यूपीएससीला सांगितले. तसेच पूजा खेडकरला यूपीएससीमधील कोणी मदत केली आहे का? याचाही तपास करण्याचे कोर्टाने पोलिसांना निर्देश दिले आहेत. दरम्यान, पूजा यांना जामीनासाठी दिल्ली हायकोर्टात जाण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech