पुणे : काही महिन्यांपुर्वी पुण्यातील कल्याणीनगर भागामध्ये झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यांची अदलाबदल करणाऱ्या डॉक्टरांचा वैद्यकीय परवाना रद्द करावा यासाठी पुणे पोलिसांनी पत्र लिहलं आहे. या दोन्ही डॉक्टरांचा वैद्यकीय परवाना रद्द करावा, अशी मागणी पुणे पोलिसांनी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे पत्राद्वारे केली आहे.
पार्शे कार अपघात प्रकरणात रक्त नमुने अदलाबदलीच्या आरोपावरून गुन्हा दाखल असलेले ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर या दोघांचा वैद्यकीय परवाना रद्द करावा, असे पत्र पुणे पोलिसांनी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलला पाठवले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. पोर्शे कार अपघात प्रकरणात पोलिसांसह डॉक्टरांनीही आरोपीला मदत केल्याचे समोर आले होते. त्यानंतर गुन्हे शाखेने कारवाई करत दोघे डॉक्टर, शिपाई यांना अटक करण्यात आली होती. आता त्यांचा द्यकीय परवाना रद्द करावा असं पुणे पोलिसांनी पत्राद्वारे म्हटलं आहे.
अल्पवयीन आरोपी कारचालकाच्या रक्ताऐवजी त्याच्या आईचे रक्त तपासणीसाठी घेतले होते. या प्रकरणात सहभाग आढळून आल्यानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली होती. मागील दहा महिन्यांपासून दोन्ही डॉक्टर तुरुंगात आहेत. या दोन्ही डॉक्टरांचा वैद्यकीय परवाना रद्द करावा, अशी मागणी पुणे पोलिसांनी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे पत्राद्वारे केली आहे.दरम्यान याच प्रकरणात पुणे पोलिसांनी दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या बडतर्फीचा प्रस्तावही पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठवला आहे.