दिवाळी फराळ परदेशात पाठविण्यासाठी पोस्ट विभाग सज्ज

0

अमरावती – परदेशातील नातेवाइकांना दिवाळीच्या फराळाचा आनंद घेता यावा म्हणून फराळ त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी टपाल विभाग यंदा सज्ज आहे. दिवाळीनिमित्त अमरावती टपाल विभागाने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला आहे. फराळाचे पदार्थ दिल्यानंतर ते नाममात्र किमतीमध्ये पॅकेजिंग करून माफक दरात परदेशात पाठवण्याची सोय केली आहे.

अनेकदा दिवाळीचा फराळ तयार असतो; पण तो पाठविण्याचा मुहूर्त लागत नाही, तसेच अनेक जण दैनंदिन कामातून वेळ काढून टपाल कार्यालयामध्ये येऊ शकत नाहीत, अशा नागरिकांसाठी घरी येऊन फराळ पार्सल घेऊन जाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी पोस्टमन घरी येऊन फराळाच्या पदार्थाचे पार्सल विनामूल्य घेऊन जातील.

नोकरी आणि शिक्षणानिमित्त विदर्भातून परदेशामध्ये जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे.परदेशामध्ये वास्तव्यास असलेल्या प्रत्येकालाच दिवाळीच्या सणासाठी भारतामध्ये येणे शक्य होत नाही. ही बाब ध्यानात घेऊन जगभरातील प्रियजनांना फराळाचे पदार्थ आणि भेटवस्तू पाठूवून त्याचा दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी करण्यासाठी टपाल विभागाने हे पार्सल परदेशात पोहोचवण्याची जबाबदारी उचलली आहे. अमरावती शहरातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये दिवाली फराळ परदेशामध्ये पाठवण्याची सुविधा तसेच तेथे फराळाचे पॅकिंग करण्याची सोयही उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन पोस्ट विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech