बांगलादेशच्या पंतप्रधान भारतात दाखल

0

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी रविवारी तिस-यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात होणा-या मोदी मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आज नवी दिल्लीत पोहोचल्या आहेत. पंतप्रधान शेख हसीना शपथविधी सोहळ्यानंतर रविवारी संध्याकाळी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयोजित केलेल्या मेजवानीलाही उपस्थित राहणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मोदींनी बांगलादेशच्या पंतप्रधानांना फोन करून नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्याला आमंत्रित केले होते. शेख हसीना यांच्याशिवाय भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ, श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू, सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफिफ हे उपस्थित राहणार आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर आला असून, भाजपने २४० जागा जिंकल्या आहेत. मात्र, २०१९ च्या तुलनेत ६३ जागा गमावल्या आहेत. तर इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकल्या आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech