१ जूनपासून खासगी वाहन प्रशिक्षण संस्था ड्रायव्हिंग टेस्ट घेणार

0

नवी दिल्ली – रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्रालयाने केलेल्या नव्या नियमांनुसार वाहन चालक परवाना घेण्यासाठी खासगी वाहन प्रशिक्षण संस्थेने दिलेले प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. वाहन चालवण्याचा परवाना मिळवण्यासाठी आता प्रादेशिक वाहन कार्यालयात म्हणजेच आरटीओत ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज राहणार नाही. येत्या १ जुनपासून या नव्या नियमांची अंमलबजावणी होणार आहे. वाहन चालक परवाना घेऊ इच्छिणारे आता खाजगी वाहन प्रशिक्षण शाळेतर्फे घेतलेल्या वाहन चालक चाचणीच्या आधारेही पक्के लायसंस मिळवू शकणार आहेत. अशा खाजगी संस्थाना वाहन चालकाची चाचणी घेण्याचे अधिकार देण्यात आले असून ते आता वाहन चालवण्याच्या पात्रतेचे प्रमाणपत्र देणार आहेत. या प्रमाणपत्राच्या आधारे व्यक्तीला वाहन चालवण्याचा परवाना मिळवता येणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech