प्रियंका वाड्रां, रविंद्र चव्हाण यांनी घेतली खासदारकीची शपथ

0

नवी दिल्ली : प्रियंका गांधी याचे मोठे भाऊ राहुल गांधी यांनी वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत 6.22 लाखांहून अधिक मते मिळवत वाड्रा विजयी झाल्या आहेत. काँग्रेस नेत्या प्रियांका वाड्रा यांनी आज, गुरुवारी खासदारकीची शपथ घेतली. केरळच्या वायनाड या मुस्लिम बहुल मतदारसंघातून त्या विजयी झाल्या आहेत. महाराष्ट्राच्या नांदेड येथील पोटनिवडणुकीत विजयी झालेले रविंद्र चव्हाण आणि प्रियंका वाड्रा यांचा शपथविधी एकाचवेळी झाला. यावेळी संविधानाची प्रत हातात घेऊन वाड्रा यांनी शपथ घेतली. प्रियांका वाड्रा वायनाडमधून मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्या आहेत.

संसदेतील गांधी घराण्यातील त्या तिसऱ्या सदस्या ठरल्या आहेत. त्यांची आई सोनिया गांधी या राजस्थानमधून पक्षाच्या राज्यसभा खासदार आहेत. तर भाऊ राहुल गांधी रायबरेलीमधून खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांना 6.22 लाखांहून अधिक मते मिळाली आहेत. तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सत्यन मोकेरी यांच्यापेक्षा त्यांना 4 लाखांहून अधिक आणि भाजपच्या नव्या हरिदास यांच्यापेक्षा 5.12 लाखांपेक्षा जास्त मते मिळाली आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech