श्री एकविरा देवी चैत्री उत्सव २०२५च्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू

0

पुणे : श्री एकविरा देवी चैत्री उत्सव २०२५ पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यांनी ३० मार्च रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते ६ एप्रिल रोजी रात्री १२ वाजेपर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३ मधील कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशान्वये वरील कालावधीत शोभेची दारु, फटाके गडावर नेणे, गडावर फटाके, वाद्ये, ढोल, ताशे, वाजविण्यास व गडावर नेण्यास बंदी करण्यात येत आहे. एकाच प्रकारची व रंगाची कपडे, वेशभूषा परिधान करणे, विशेषत: टी शर्ट वापरणे, कोंबडे, बकरे, पशु, पक्षी यांचा बळी देणे व त्यांना मंदिरावर सोडणे, कार्ला लेणी व परिसरातील ऐतिहासिक वास्तु व शिल्पांना हानी पोहचविणे अथवा विद्रुपीकरण करणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ मधील तरतुदी व प्रचलित कायद्याप्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech