नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाणी वाचवण्यासाठी आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. मानवी संस्कृतीत पाण्याची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करताना, भविष्यातील पिढ्यांसाठी या अमूल्य संसाधनाचे रक्षण करण्यासाठी सामूहिक कृती करण्याचे आवाहन त्यांनी केले. मोदींनी X या समाज माध्यमावर लिहिले की; “जागतिक जल दिनानिमित्त, आम्ही पाणी/जल वाचवण्यासाठी आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो. पाणी ही संस्कृतींची जीवनरेखा आहे आणि म्हणूनच भविष्यातील पिढ्यांसाठी त्याचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे!”