ट्रक-बस ड्रायव्हरला जी शिक्षा ती पोर्श चालवणाऱ्या मुलाला का नाही?

0

मुंबई : पुण्यातील भरधाव कार दुर्घटनेप्रकरणी दोघांचा जीव गेल्यानंतर आता त्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीदेखील प्रतिक्रिया देत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. नरेंद्र मोदी हे दोन भारत निर्माण करत आहेत, ज्या ठिकाणी न्याय ही गोष्टदेखील श्रीमंतांची गुलाम झाली आहे असा सणसणीत आरोप राहुल गांधींनी केला. ट्रक ड्रायव्हर किंवा इतरांना जो न्याय दिला जातो तोच न्याय या पुण्यातील धनाड्याच्या मुलाला का दिला गेला नाही असा सवालही त्यांनी विचारला आहे.

बस ड्रायव्हर, ट्रक ड्रायव्हर , ओला, उबेर ड्रायव्हर, ऑटो ड्रायव्हर यांच्याकडून जर काही चूक झाली आणि अपघातात कुणाचा चुकून मृत्यू झालाच तर त्यांना दहा वर्षांची शिक्षा ठोठावली जाते. त्याचसोबत त्यांच्याकडून चावी घेऊन ती फेकली जाते. पण जर श्रीमंत घरातील १६-१७ वर्षांचा मुलगा जर दारू पिऊन दोन लोकांची हत्या करतो, तर त्याला सांगितले जाते की अपघातावर निबंध लिहा, असे करा, तसे करा.

त्या श्रीमंत मुलाला ज्या पद्धतीने शिक्षा म्हणून निबंध लिहायला लावला जातोय, तशा पद्धतीने त्या बस ड्रायव्हर, ट्रक ड्रायव्हरकडून का लिहून घेतले जात नाही. दोन भारत बनले आहेत, एक श्रीमंतांचा आणि एक गरिबांचा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारल्यानंतर ते म्हणतात की, मी सर्वांनाच गरीब बनवू का? पण प्रश्न हा नाही, प्रश्न आहे तो न्यायाचा. गरिबाला एक न्याय आणि श्रीमंतांना एक न्याय असे का? न्याय हा सर्वांनाच सारखा मिळाला पाहिजे. मग तो गरीब असो वा श्रीमंत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech