त्याची पत्नी-मुलं किंचाळत होते, मारु नका, पण नराधमाला पाझर फुटेना
मुंबई – त्याची पत्नी-मुलं किंचाळत होते, मारु नका, पण नराधमाला पाझर फुटेना, कायद्याच्या चिंधड्या, लोकांचे हाल! भर रस्त्यात मारहाण करा, ‘गुंडागर्दी’ हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी भर रस्त्यावर एका कार चालकाला लोखंडी पाइपाने मारहाण केली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये आमदार महेंद्र थोरवे यांचा शिवा नावाचा बॉडीगार्ड एका व्यक्तीला भर रस्त्यावर मारहाण करत आहे. एका होंडा सिटी कारमध्ये ही व्यक्ती बसलेली आहे. त्याची बायका मुलं सुद्धा कारमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक राहिलेला नसल्याचे उत्तम उदाहरण आता पहायला मिळाले. महाराष्ट्रात गुंडाराज! मिंधेंच्या आमदाराच्या, महेंद्र थोरवे ह्यांच्या ‘शिवा’ नावाच्या बॉडीगार्डने नेरळ येथे भर दिवसा, भर रस्त्यात एका व्यक्तीला मारहाण केली. त्या व्यक्तीची बायका मुलं रडत होती, पण कोणी मदतीला यायची हिम्मत केली नसल्याने यावेळी उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी निशाना साधला आहे.
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना सुरू झाला आहे. अशातच उद्धव ठाकरे गटाने शिंदे गटाच्या आमदाराच्या सुरक्षारक्षकांचा संतापजनक व्हिडीओ समोर आणला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महेंद्र थोरवे यांचा शिवा नावाचा हा बॉडीगार्ड एक लोखंडी पाइप घेऊन या व्यक्तीला बेदम मारहाण करत आहे. एकापाठोपाठ दोन वेळा त्याने पाइपाने या व्यक्तीला मारहाण केली आहे. हा व्हिडीओ नेरळ परिसरातला असल्याचं सांगितलं जात आहे.