नवी दिल्ली – राहुल गांधींच्या वक्तव्यावरुन महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत राडा झाला. त्याच वक्तव्याला संसदेत थेट पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांनीही आक्षेप घेतला.. राहुल गांधींनी संसदेत भगवान महादेवाचं चित्र दाखवलं. त्रिशूळ हे हिंसेचं नसून अहिंसेचं प्रतीक आहे असं राहुल गांधींनी सांगितलं.. राहुल गांधींनी गुरुनानक यांचंही चित्र दाखवलं.. ज्याला भाजपच्या खासदारांनी आक्षेप घेतला..भगवान महादेव आणि गुरुनानक हे ”डरो मत” असं सांगतात.. पण स्वत:ला हिंदू म्हणवणारे देशात हिंसा पसरवतात असा टोला राहुल गांधींनी भाजपला लगावला. याला पंतप्रधान मोदी, अमित शाहांसह भाजपच्या सर्वच खासदारांनी आक्षेप घेतला.
राहुल गांधी यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभाग घेतला.. यावेळी त्यांनी संविधान हातात पकडून बोलण्यास सुरूवात केली. पंतप्रधान मोदी आणि भाजपवर हल्लाबोल करण्यास सुरूवात केली. खोटे खटले चालवल्याचा आरोप केला. ईडी चौकशीचाही उल्लेख केला. इंडिया आघाडीच्या नेत्यांना जेलमध्ये डांबलं पण अशावेळी सरकारशी लढण्याची हिंमत कशी आली? हे सांगताना राहुल गांधींनी भगवान शंकर, महावीर, गुरुनानक, येशू अशा विविध धर्माच्या देवांचे फोटो हातात घेतले. हे सर्व ‘डरो मत’ असं सांगतात.. असं म्हंटलं. अशातच त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. स्वतःला हिंदू म्हणवणारे लोक दिवसरात्र हिंसा आणि द्वेष पसरवतात’.. आणि त्यांच्या या वक्तव्यानंतर नवा वाद पेटला. स्वत: पंतप्रधान मोदींनीही उभे राहून विरोध दर्शवला. संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे गंभीर बाब असल्याचे सांगितले… तर राहुल गांधींनी संपूर्ण देशाची माफी मागावी, अशी मागणी गृहमंत्री अमित शाहांनी केली.