नाशिक : राज ठाकरे यांनी श्रद्धेचा अपमान केला असून सिंहस्थ कुंभमेळ्याचे एक वेगळे महत्त्व आहे हे त्यांना कळालेच नाही, अशा शब्दांमध्ये महामंडलेश्वर सुधीर दास महाराज यांनी राज ठाकरे यांच्यावरती टीका केली आहे. पुण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित भाषणामध्ये बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिंहस्थ कुंभमेळा वरती टीका केली आता राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावरती सर्वत्र टीका होत असून नाशिकच्या काळाराम मंदिराचे महंत महामंडलेश्वर सुधीर दास महाराज यांनी राज ठाकरे यांच्या वरती टीका करताना म्हटले आहे की, सिंहस्थ कुंभमेळा एक श्रद्धा आहे आणि या श्रद्धे विषय नेहमी ठाकरे भाषेमध्ये चर्चा करणे हे योग्य नाही काही विषयावरती ठाकरे शैलीमध्ये बोलले म्हणजे झाले असे होत नाही असे सांगून महंत सुधीर दास यांनी राज ठाकरे वरती टीका करताना पुढे म्हणाले आहे की आत्तापर्यंत कोट्यावधी लोक कुंभमेळामध्ये स्नान केले आहे हा श्रद्धेचा विषय आहे श्रद्धेचा अवमान करणं हे योग्य नाही अशी टीका देखील त्यांनी केली.