शिवपुतळा दुर्घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा द्या – रामदास आठवले

0

– राजकोट येथील शिवपुतळा दुर्घटनेची केली पाहणी

सिंधुदुर्ग – शिवपुतळा दुर्घटना ही दुर्दैवीच घटना आहे. पुतळ्याची निर्मिती चुकीची करण्यात आल्याने ही दुर्घटना घडली. यात राज्य शासनाला दोषी ठरविणे योग्य नाही. आता पुन्हा नव्याने पुतळा उभा करणे आणि शिवप्रेमींना पुन्हा आदराचे स्थान निर्माण करणे हे महत्वाचे आहे. या घटनेवर राजकारण होता नये, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय विभाग राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. मंत्री रामदास आठवले यांनी रविवारी राजकोट किल्ला येथे भेट देत शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेची माहिती घेत पाहणी केली. त्यांनतर शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, शिवपुतळा बनविणाऱ्यांकडून मोठी चूक झाल्यानेच ही दुर्घटना घडली असेल किंवा जे यात दोषी असतील अशा चुकीला माफी नसून यातील दोषींना थेट फाशीचीच शिक्षा द्यायला हवी, असेही आठवले म्हणाले.

राजकोट किल्ला येथे भेट देत शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेची माहिती घेत पाहणी केली. त्यांनतर शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. रामदास आठवले म्हणाले, सर्वांनी एकत्रित होवून घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. यातील दोषींचा शोध घेऊन त्यांना कडक शासन होण्यासाठी शासन यंत्रणांना सहकार्य करायला हवे. विरोधकांकडून फक्त टिका आणि राजकारण हिच भुमीका घेण्यात येत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून अशाप्रकारची संयुक्त समिती गठीत करण्याच्या सूचना करू असेही आठवले यांनी सांगितले.

पुतळा हा फक्त चुकीच्या पद्धतीनेच केलेल्या निर्मितीमुळेच कोसळला आहे. यात पुतळा उभारणारी व्यक्ती दोषी असून त्याचा शोध घेऊन यातील इतरही दोषींची नावे समोर यायला हवीत. अशा घटनेमुळे संपूर्ण देशाला दुःख झाले आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही माफी मागितली आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनीही माफी मागितली आहे. असे असतानाही विरोधक नाहकपणे आरोप करत सुटले आहेत. पोलीसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री यांनीही याबाबत तात्काळ गुन्हे दाखल करून संशयीतांना ताब्यात घेण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे शासन गांभिर्याने याकडे पाहत आहे.

राज्यात कोणताही मुद्दा नसल्याने विरोधकांकडून नाहकपणे टिका करून आंदोलन केली जात आहेत. आम्ही राज्यात पुन्हा सत्तेत येणार आहोत. १८० जागांचे लक्ष आमचे असून त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. महायुती एकसंघपणे या निवडणुकीत उतरणार आहे. महाराष्ट्रातही आमची ताकद आहे. महायुतीच्या बाजूने आम्ही खंबीरपणे उभे असल्याचे आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech