यंदा सरकारकडून विक्रमी गहू खरेदी?

0

नवी दिल्ली : सध्या सरकारकडून मोठ्या प्रमाणात गव्हाची खरेदी सुरु आहे. मागील वर्षीचा गहू खरेदीचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे. सध्या गव्हाची खरेदी २६१ लाख टनांच्या जवळपास आहे. ही खरेदी २७० लाख टनांपर्यंत पोहोचेल असा विश्वास एफसीआयच्या अधिका-यांनी व्यक्त केला. सध्या २६०.८ लाख मेट्रीक टन गव्हाची खरेदी झाली. त्यामुळे सरकार यावर्षी मागील वर्षीच्या गहू खरेदीचा विक्रम मोडण्याची शक्यता दाट आहे. कारण अद्यापही अनेक राज्यांमध्ये सरकारकडून गव्हाची खरेदी सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशने गहू खरेदीचा कालावधी हा ३१ मे पर्यंत वाढवला आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये आत्तापर्यंत जास्त गव्हाची खरेदी केली आहे. उत्तर प्रदेशातही गहू खरेदीला मोठ्या प्रमाणात चालना देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पंजाबमध्ये १२४ लाख टन तर हरियाणामध्ये ७१.४ लाख टन गव्हाची खरेदी झाली आहे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अधिका-यांना दिलेल्या माहितीनुसार, एकूण गव्हाची खरेदी ही २७० लाख टनांपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आणि इतर कल्याणकारी योजनांतर्गत ८० कोटी गरिबांना मोफत अन्नधान्य पुरविण्याच्या अन्न सुरक्षेची गरज पूर्ण करण्यासाठी सध्याची खरेदीची पातळी आणि आमच्याकडे असलेला साठा पुरेसा असेल. आमच्याकडे बाजारासाठी चांगला साठा देखील असेल. गरज पडल्यास किमती तपासण्यासाठी हस्तक्षेप केला जाईल अशी माहिती अधिका-यांनी दिली आहे. मध्य प्रदेशातील गव्हाची खरेदी कमी झाली आहे. तर उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील खरेदीमध्ये लक्षणीय वाढ झाली. सध्याची खरेदीची पातळी पाहता, सरकार यावर्षी गव्हाच्या निर्यातीवरील निर्बंध उठवेल अशी शक्यता नाही.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech