मुंबई – लोकराज्य जुलै-ऑगस्ट 2024 अंकाचे आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांची उपस्थिती होती. गेल्या दोन वर्षांत शासनाने घेतलेल्या निर्णयांचा समग्र आढावा लोकराज्य अंकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अंकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्रिमंडळातील सदस्यांचे मनोगतपर लेखांचा समावेश करण्यात आला आहे. या अंकामध्ये शासनाने आतापर्यंत घेतलेला निर्णयांचा थोडक्यात आढावा लेख स्वरूपात घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमाचा आढावा आणि महिला लाभार्थ्यांच्या प्रतिक्रियांचाही समावेश करण्यात आला आहे. विविध विभागांच्या निर्णयांचा या अंकात समावेश असल्याबद्दल मंत्र्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.