टाटांच्या कंपन्यांमध्ये आरक्षण लागू होणार

0

नवी दिल्ली : हजारो कोटींच्या दातृत्वामुळे कायम चर्चेत असलेला टाटा ग्रुप आता आणखी एका ऐतिहासिक निर्णयामुळे चर्चेत आलेला आहे. रतन टाटा हे कायम देशासमोर आदर्श निर्माण करत असतात. आता त्यांच्या टाटा ग्रुपने कंपनीमध्ये आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

जमशेदपूर इथल्या टाटा स्टील कंपनीमध्ये काही समूदायांना नोक-यात आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. अपंग, वंचित आणि एलजीबीटीक्यूआयए+ समूदायातील व्यक्तींना टाटा स्टील प्राधान्यक्रमाने नोकरी देणार आहे. टाटा स्टीलने अशा ठाराविक लोकांना २५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा स्टीलमधील वरिष्ठ अधिकारी जयसिंग पांडा यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, प्रत्येकाला समान अधिकार मिळवून देणं ही एक जबाबदारी आहे. विविधता ही आपली ताकद आहे. यामुळे कामातील नाविन्यपूर्णतेला बळ मिळेल.

कंपनीने यापूर्वीच ट्रान्सजेंडरसाठी सवलत दिलेली होती. त्यासह आता वंचित आणि अपंगांसाठीही कंपनीने एक पाऊल पुढे टाकले आहे. टाटांच्या जमशेदपूर येथील प्लांटमध्ये तृतीयपंथियांसाठी सर्व सोयी-सुविधा आहेत. स्वतंत्र स्वच्छतागृहेदेखील आहेत. जगभरातील एलजीबीटीक्यूआयए+ समुदाय जून महिना ‘प्राइड मंथ’ म्हणून साजरा करतात. भारतातील कॉर्पोरेट जग केवळ एलजीबीटीक्यूआयए+ समुदायातील लोकांना नोक-या देत नाही तर त्याऐवजी या समुदायातील लोकांना प्रशिक्षण देऊन एलजीबीटीक्यूआयए+ टॅलेंट तयार करत आहे. टाटा कंपनीने एक या माध्यमातून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech