महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक प्रगतीचा संकल्प : आ सुधीर मुनगंटीवार

0

चंद्रपूर : लाडक्या बहिणींसह शेतकरी, युवक, सर्वसामान्य नागरिक, उद्योजक आदी सर्वच घटकांनी महायुतीला अभूतपूर्व बहुमताने विजयी केले त्या सर्वच घटकांना न्याय देणारा ,महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीचा संकल्प मांडणारा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मांडल्या बद्दल माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे.

आर्थिक सुधारणांच्या माध्यमातुन, भांडवली खर्चातील वाढीद्वारे विकासचक्रास चालना देऊन राज्याच्या विकास दरात वाढ करण्याचे उद्दीष्ट साध्य करण्याचा अर्थमंत्र्यांनी व्यक्त केलेला मनोदय अतिशय महत्वाचा आहे. मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था १४० बिलीयन डॉलर वरुन सन २०३० पर्यंत ३०० बिलीयन डॉलर तर सन २०४७ पर्यंत १.५ ट्रिलीयन डॉलर पर्यंत नेण्याचे उद्दीष्ट डोळ्या समोर ठेवून वाटचाल करण्याचा निर्धार देखील राज्याच्या प्रगतीच्या व विकासाच्या दृष्टीने आशावादी आहे.

पायाभूत सुविधा, कृषी क्षेत्र, रस्ते विकास, पर्यटन विकास, संस्कृतीच्या पाऊलखुणा जपणे, महिलांचे कल्याण, युवक कल्याण, क्रीडा विषयक विकास असा चौफेर विकासाचा संकल्प मांडत पंतप्रधान विश्वगौरव नरेंद्रभाई मोदीजी यांच्या सबका साथ, सबका विकास या सूत्रानुसार महाराष्ट्र आता थांबणार नाही अशी अर्थमंत्र्यांनी दिलेली ग्वाही प्रचंड आशावादी आहे असेही मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech