राज्यातील सर्वांत तरुण आमदार रोहित पाटील

0

सांगली- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री दिवंगत आबा पाटील यांचे चिरंजिव राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून कवठेमहांकाळ मतदारसंघात उमेदवार होते. त्यांचा या लढतीत यंदा चुरशीची लढत पहायला मिळाली. मात्र, या चुरशीच्या लढतीमध्ये राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर.आर.पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांनी बाजी मारली असून ते राज्यातील सर्वांत तरुण आमदार ठरले आहेत.ते २५ वर्षांचे आहेत. त्यांच्या विरोधात अजित पवार गटाने त्यांच्या विरोधात भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांना उमेदवारी दिली होती. पण माजी खासदार संजयकाका यांचा पराभव करत रोहित पाटील यांनी एक लाख २६ हजार मते मिळवत आघाडी घेतली. संजयकाका पाटील यांना ९९ हजार मतांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे रोहित पवार यांचा पराभव करण्यासाठी त्यांच्या नावासारखेच तीन इतर उमेदवारही देण्यात आले होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech