“राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे मराठीशी आला संबंध ”- पंतप्रधान

0

दिल्लीत ९८ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ

नवी दिल्ली : मराठीतून विचार केल्यावर ज्ञानेश्वरांच्या “माझ्या मराठीची बोलू, परि अमृताताशीची पैजा जिंके” या ओवींचे अलबत स्मरण होते. परंतु, माझा मराठी भाषेशी पहिला संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे आल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. दिल्लीच्या विज्ञान भवनात 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ केल्यानंतर पंतप्रधान बोलत होते. यावेळी संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवळकर, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी मोदी म्हणाले की, मराठी माणसांनी रोवलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बिजाचा आता वटवृक्ष झालाय. शताब्दी वर्षात गेलेल्या संघाने माझ्यासारख्या अनेकांना देशासाठी जगायला शिकवले. संघामुळेच माझा मराठी भाषेशी संबंध आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. यावेळी मराठी सारस्वतांना नमन करताना मोदी म्हणाले की, मराठी साहित्यात देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास आहे. ज्ञानबा तुकारामांच्या मराठीला राजधानी अतिशय मनापासून अभिवादन करतो. पवारांमुळे या कार्यक्रमात येण्याची संधी मिळाली. आजतर जागतिक मातृभाषा दिवस आहे. तुम्ही साहित्य संमेलनाचा दिवसही अतिशय चांगला निवडल्याचे मोदींनी आपल्या भाषणात नमूद केले.

मराठी भाषेमध्ये जशी शूरता आहे तशी विरताही आहे, संवेदनाही आहे आणि सहवेदनाही आहे म्हणूनच भक्ति शक्ती युक्ती हे मराठी सामर्थ्य आहे असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. जगभरात १२ कोटी मराठी भाषिक लोक आहेत. अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी काही दशके मराठी लोक प्रयत्न करत होते. नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळाला आहे. ते काम पूर्ण करण्याचे सौभाग्य मला लाभले आहे. असेही मोदी यांनी स्पष्ट केले. भाषा हे केवळ संवादाचे माध्यम नाही तर ते संस्कृतीचे संवाहक असते. भाषा समाजात निर्माण होते पण समाज घडवण्याचेही महत्वाचे काम भाषेच्या माध्यमातूनच होत असते. आपल्या मराठीने देशभरातील अनेक लोकांना अभिव्यक्त होण्याची संधी देऊन संस्कृती समृद्ध केली आहे.

सर्मर्थ रामदास यांच्या ओळी ‘मराठा तेतुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा आहे तितके जतन करवे पुढे आणि मिळवावे राज्य जतन करावे’ याचा संदर्भ घेत त्यांनी सांगितले की मराठीत शुरताही आहे विरताही आहे, सौदर्यही आहे संवेदनाही आहे, समानताही आहे समरसताही आहे, आध्यात्माचे स्वर आहेत तर आधुनिकतेची लहरही आहे, मराठीत भक्ती आहे शक्तीही आहे आणि युक्तीही आहे. जेव्हा भारताला आध्यात्माची गरज होती तेंव्हा महाराष्ट्रातील संतांनी प्राचिन काळातील ॠषींच्या ज्ञानाला मराठी भाषेत आणले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास, संत बहिणाबाई, गोरा कुंभार, तुकडोजी महाराज यासह असंख्य संतांनी संत परंपरेच्या माध्यमातून देशाला दिशा देण्याचे काम केल्याचे मोदी यांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech