ठाणे : राजेंद्र गोसावी
ठाण्यातील साहित्यिक, पत्रकार अॅड. रुपेश पवार यांनी पर्पल जल्लोष २०२५, दिव्यांग महा उस्तवात संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. त्यात ते म्हणाले,निमंत्रित दिव्यांग कवींनी आपल्या दिव्यांग भावनेला कवितेत कुठेही मांडले नाही, तर त्यांनी सामाजिक जाणिवेच्या प्रभावी कविता सादर केल्या. आज सामान्य माणसाच्या मनात कुठेही सामाजिक जाणीव राहिलेली नसताना. या दिव्यांग कवींनी. सामाजिक जाणीवेतुन कविता सादर केल्या. हे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन रुपेश पवार यांनी केले. ते पर्पल जल्लोष पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्रमात शुक्रवारी १७ जानेवारीला बोलत होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पुण्यातील माहिती तंत्रज्ञान विषयातील दिव्यांग तज्ञ निलेश छेडवेलकर यांच्या माध्यमातून या संमेलनाचे आयोजन केले आहे. हे दिव्यांग संमेलन तीन दिवसीय आहे. यात दिव्यांगांचे कार्यक्रम, दिव्यांग विषयक तंत्रज्ञानाची माहिती तसेच दिव्यांग योजनांबद्दल मार्गदर्शन केले जाणार आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी ठाण्यातील लोकप्रिय कवी रुपेश पवार यांना अध्यक्ष व कार्यक्रमाचे सूत्रसंचालक म्हणून निमंत्रित केले होते. यात त्यांनी देव कुठे शोधू नका देव आपल्यातच आहे. अशा या देवाला विसरल्यावर आपण अपयशी ठरतो. हे वैश्विक तत्त्वज्ञान सांगणारी कविता रुपेश यांनी सादर केली. या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या विविध भागातून दहा कवी एकत्र आले होते. यात भूषण तोषणीवाल, संजय पवार, धम्मपाल बाविस्कर, गणेश खरात, बापुराव खरात, राजेंद्र लाड, नरेश शिंदे, प्रा. केशरचंद राठोड, अहमद शेख आणि संगीता ठोंबरे हे सर्व काव्य कलाकार उपस्थित होते. पवार यांनी हे काव्य संमेलन कमीत कमी वेळात परिपूर्ण केले आणि आयोजकांची मने जिंकली.