मॉस्को – रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचे अल्ताई येथील निवासस्थान जळून राख झाल्याची बातमी समोर आली आहे. पुतिन यांच्या अल्ताई येथील निवासस्थानाला आग लागल्याचे वृत्त आहे. अल्ताई प्रजासत्ताकच्या ओंगुडेस्की जिल्ह्यात व्लादिमीर पुतीन यांचे निवासस्थान असलेली इमारत आगीत पूर्णपणे जळून खाक झाली अशी माहिती समोर आली आहे. पुतिन येथे मेडिसिनल बाथसाठी येत असतात. पुतिन यांच्या घरावर युक्रेनच्या लष्कराने हल्ला केला की आगीचे आणखी काही कारण आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पुतीन यांच्या निवासस्थानाची जळणारेफोटो आणि व्हीडीओ रशियन माध्यमांतून समोर आली आहेत. फोटो पाहिल्यानंतर, आढळले की अल्ताई निवास परिसरातील एक इमारत जळून खाक झाली आहे. अधिकृतपणे, हे गॅझप्रॉमच्या मालकीचे अल्ताई यार्ड सेनेटोरियम आणि रिसॉर्ट कॉम्प्लेक्स आहे, येथे पुतिन मेडिसिनल बाथसाठी येतात.
पुतिन यांचे हे घर ३३ मिलियन अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त खर्च करून बांधण्यात आले आहे. २०१० मध्ये अल्ताई रिपब्लिकच्या ओंगुडेस्की जिल्ह्यातील वर्गीकृत बांधकाम प्रकल्पाची माहिती समोर आली. यानंतर यावर झालेल्या खर्चाचा तपशील समोर आला. हे घर पुतिन यांच्याशी संबंधित असल्याचा दावा स्थानिक विरोधी लोकांनी वारंवार केला आहे. कोणत्याही सामान्य रशियनला येथे येण्यास मनाई आहे. या घराचा उपयोग पुतिन यांनी मेडिसिन बाथसाठी केला होता. आमचे सरकार युक्रेनच्या मुद्यावर चर्चेसाठी तयार आहे असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी काही दिवसापूर्वी सांगितले. यासंदर्भात चीन दौ-यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत व्लादिमीर पुतिन यांनी भाष्य केले. त्यामुळे ८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपुष्टात येणार असल्याची चर्चा आहे. जोपर्यंत इतर देश आपले हित लक्षात ठेवतील तोपर्यंत रशिया चर्चेसाठी तयार आहे, असे व्लादिमीर पुतिन यांनी चीनची अधिकृत वृत्तसंस्था शिन्हुआला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. आम्ही युक्रेनवर चर्चेसाठी तयार आहोत, परंतु अशा चर्चेत संघर्षात गुंतलेल्या सर्व देशांचे हित लक्षात घ्यावे लागेल, असे व्लादिमीर पुतिन म्हणाले.