अकोला – अकोला शहरातील माजी नगरसेवक अमोल गोगे यांच्या ७ वर्षीय मुलीचा कूलरचा शॉक लागून मृत्यू झाला. काल रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली. कूलरला असलेल्या बटनांची एक वायर तुटून त्यामधील विजेचा प्रवाह कूलरच्या जाळीला लागला. त्यामुळे संपूर्ण कूलरमधून विजेचा प्रवाह सुरू होता. अशातच गोगे यांची मुलगी कूलरजवळ गेली. खेळता खेळता तीचा हात कुलरला लागला. तिचे आईवडील आणि इतर कुटुंबीय घरातच होते. मात्र, त्यांच्या लक्षात येईपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. गोगे कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनी तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेने गोगे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.