शरद पवारांनी घेतले संतोष जगदाळे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

0

पुणे : पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये २७ पर्यटकांचा मृत्यू झाला. पहलगाममधील बेसरन परिसरात हजारोंच्या संख्येने असलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी नाव आणि धर्म विचारत पर्यटकांची हत्या करण्यास सुरुवात केली.

या हल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला असून यामध्ये पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा समावेश आहे. त्यांचे मृतदेह गुरुवारी सकाळी पुणे विमानतळावर आणण्यात आले आहेत. यानंतर संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचे मृतदेह त्यांच्या घरी नेण्यात आले. यावेळी त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी पुण्यातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.

तसेच अनेक राजकीय नेते देखील अंतिम निरोप देण्यासाठी जगदाळे यांच्या घरी पोहचेल आहेत. राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार हे कर्वेनगर येथे जगदाळे कुटुंबाला भेटण्यासाठी आले आहेत. त्यांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. शरद पवार यांच्यासमोर जगदाळे कुटुंबियांना अश्रू अनावर झाले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech