युबीटी मधल्या बी मुळेच शिंदे यांची झाली गोची – राऊत

0

नाशिक : युबीटी मधला बी हा मध्ये असल्यामुळे तो जड जात आहे आणि आज खरी शिवसेना ही कायम राहिली आहे. येणाऱ्या काळामध्ये एकनाथ शिंदे यांना अजून काही अनुभव येतील असा विश्वास उबाठाचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. उबाठा शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे रविवारी नासिक दौऱ्यावरती होते. त्यांचे स्वागत जिल्हाप्रमुख डीजी सूर्यवंशी, महानगरप्रमुख विलास शिंदे, उपनेते दत्ता गायकवाड, सुधाकर बडगुजर, देवानंद बिरारी, अन्य नेते व शिवसैनिकांनी केले. राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली ती फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आणि भाजपाच्या दावणीला बांधण्यासाठी फोडली पण त्यातून शिवसेनेचे कोणतेही नुकसान झाले नाही आणि ते होणार पण नाही असे स्पष्ट करून संजय राऊत म्हणाले की आता त्यांची मनसुबे पुरे होत नाहीये त्यामुळे त्यांचं महत्त्व संपलेला आहे त्याला कारण आहे उबाठा मध्ये असलेला ब हा आडवा येत आहे त्यामुळेच शिंदे यांचे स्वप्न पूर्ण होत नाही आणि शिंदेंचे राजकारणही पुरे होत नाही. आणि त्यामुळे त्यांच्या राजकारणाला येणाऱ्या काही दिवसांमध्ये विराम मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एका प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, भाजपा हिंदुत्वापासून लांब चाललेली आहे आज देशभर वफ बोर्डाचा विषय सुरू आहे यापासून गोरगरीब जनतेला काय मिळालं तर काहीच नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वफ बोर्डाचा आणि हिंदुत्वाचा संबंध काय असा प्रश्न उपस्थित करून राऊत पुढे म्हणाले की, या सर्व प्रश्नांवरून शिवसेने बाबत वेगळी भूमिका व्यक्त केली गेली पण ती चुकीची आहे असे मत व्यक्त करत संजय राऊत म्हणाले की आतापर्यंत देशातील अनेक संस्था या सरकारने विकले आहेत आता वफ बोर्डाची जमीन विकायची आहे आणि ती आपल्या उद्योगपती मित्रांना मिळावी यासाठी म्हणूनच हा सर्व घाट घातल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

दीपक केसरकर यांनी मोदींना भेटण्यासाठी शिवसेनेला आमची गरज लागते असे म्हटल्यावर त्याला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की केसकर यांना माहिती नाही की मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये अतिशय चांगले संबंध आहेत एकमेकांना ते फोन करून चर्चा करत असतात माहिती घेत असतात माहिती देत असतात अशी सर्व परिस्थिती असताना कोण केसकर आणि त्यांनी स्वतःला एवढं मोठं का समजावं आम्हाला शिवसेना म्हणून मोदी ओळखतात आणि मोदींची ओळख ही शिवसेनेला आहे अशा शब्दांमध्ये उत्तर देऊन संजय राऊत पुढे म्हणाले की, भाजप पेक्षा शिवसेना हा मोठा भाऊ आहे. शिवसेनेची सपना ही भाजपच्या आधी झाली आहे असे सांगून राऊत पुढे म्हणाले की आजची भाजपा आहे ती हायजॅक केलेली भाजपा आहे जुनी भाजपची पद्धत वेगळी होती राजकारण वेगळं होतं आज जुन्या भाजपातील जे नेते आहे ते बंदी वासात आहे याची शोकांतिका वाटते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech