पुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास देशभरातील शिवप्रेमींना माहीत व्हावा, या उद्देशाने मराठा टायगर फोर्सच्या वतीने वेगवेगळ्या राज्यांत छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंतीचे आयोजन केले आहे. याच धर्तीवर यावर्षी दि. 22 फेब्रुवारी रोजी राजस्थान येथील जैसलमेर जिल्ह्यात भारत-पाकिस्तान सीमेवर असणार्या श्री तनोट राय माता मंदिर परिसरात सीमा सुरक्षा दलाच्या जवानांसोबत शिवजयंती साजरी होणार आहे, अशी माहिती फोर्सचे संस्थापक अध्यक्ष संदीप लहाने पाटील, विशाल लहाने पाटील आणि महेश टेळे यांनी दिली.
शिवजयंतीनिमित्त महाराष्ट्रीय पद्धतीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण, शिवव्याख्यान, पुरस्कृत बक्षिसे, सन्मान समारंभ तसेच सीमा सुरक्षा दलामध्ये कार्यरत असणार्या काही अधिकारी व कर्मचारी शिवप्रेमींना तसेच वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्यांना देखील छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या नावाने एकूण पाच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.