मुंबई – शिवसेनेत सुरुवातीपासून मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे महाडचे आमदार भरत गोगावले यांना अखेर महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे. भरत गोगावले यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आपल्या पक्षातील नेत्यांना मंत्रिपदाचा दर्जा तसेच महामंडळांवर नियुक्त्या केल्या जात आहेत. यामध्ये आता भरत गोगावले यांची वर्णी लागली आहे.
मंत्रिपदासाठी जवळपास गेली दोन वर्ष प्रतिक्षेत असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांना राज्य परिवहन अर्थात एसटी महामंडळाचे अध्यक्षपद मिळाले आहे. तसेच मंत्रिपद नसले, तरी कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या महामंडळाचे अध्यक्षपद गोगावले यांना देऊन आगामी विधानसभा निवडणुकीआधीच त्यांची नाराजी दूर करण्याचा हा प्रयत्न आहे. यापूर्वी आमदार संजय शिरसाट यांची सिडकोच्या अध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली आहे.