कर्नाटक : कर्नाटकचे भाजप नेते देवराजे गौडा यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी.के.शिवकुमार यांच्यावर मोठा आरोप केला आहे. माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस प्रदेशाध्यक्ष एचडी कुमारस्वामी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा खराब करण्यासाठी डी.के. शिवकुमार यांनी १०० कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा दावा भाजप नेते देवराजे गौडा यांनी केला आहे. देवराजे गौडा यांना नुकतीच एका लैंगिक शोषण प्रकरणात अटक करण्यात आली होती. आज (१८मे) देवगौडा यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे, त्यादरम्यान माध्यमांशी बोलताना देवेगौडा यांनी हा मोठा दावा केला आहे.
देवगौडा यांनी डी.के.शिवकुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, ”जेव्हा मी शिवकुमार यांची ऑफर नाकारली, तेव्हा माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि मला अटक करण्यात आली. माझी सुटका झाल्यानंतर मी स्वतः कर्नाटकात काँग्रेसचे सरकार पडणार आहे.”असं सूचक विधान देखील देवगौडा यांनी केले आहे. देवगौडा पुढे म्हणाले की, ” डी. के. शिवकुमार यांचा पंतप्रधान मोदी व एचडी कुमारस्वामी यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न होता. पोर्नोग्राफिक व्हिडीओच्या बाबतीत शिवकुमार यांनी मोठी योजना आखली होती, त्याअंतर्गत ते पंतप्रधान मोदी, एचडी कुमारस्वामी यांच्यासह भाजपची प्रतिमा खराब करण्याचा कट रचत होते. यासाठीच मला १०० कोटींची ऑफर देण्यात आली होती. शिवकुमार यांना एचडी कुमारस्वामींचे राजकारण संपवायचे होते. या कटात सहभागी होण्यास नकार देताच माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.”