आष्टा परिसरातील दुर्घटनेत ३ पोलिस जखमी झाले
भोपाळ : केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या ताफ्यातील एका वाहनाला आज, शनिवारी मध्यप्रदेशात अपघात झाला. आष्टा पोलीस स्टेशन परिसरातील बेदाखेडी गावाजवळ झालेल्या अपघातात पोलिसांचे वाहन अनियंत्रित होऊन उलटले. यात 3 पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भातील माहितीनुसार, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान शनिवारी भोपाळहून देवास जिल्ह्यातील खाटेगाव संदलपूरला जात होते. त्यांचा ताफा आष्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेदाखेडी गावाजवळ पोहोचताच, त्यांच्या ताफ्यातील एक गाडी नियंत्रणाबाहेर गेली यामुळे उलटली. अपघातामध्ये एएसआय एसपी सिमोलिया, नीरज शुक्ला आणि आकाश अटल यांच्यासह ३ पोलिस जखमी झाले. जखमी पोलिसांना तात्काळ सिहोर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.या अपघातामध्ये फक्त तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या कर्मचाऱ्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अन्य कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.