उरण/पेण : शेकाप ने उरण व पेण विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार महेश बालदी आणि रविसेठ पाटील यांना आज एका प्रसिध्दी पत्रकान्वये पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात महाआघाडीला मोठा धक्का बसला असून महायुतीच्या उमेदवारांची ताकद वाढली आहे.
शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी प्रसिध्दी पत्रक काढून या पाठिंब्याची घोषणा केली आहे. त्यात ते म्हणतात की तमाम मतदारांना आवाहन करण्यात येत आहे की, बांधवांनो, उद्या २० नोव्हेंबर रोजी आपण सर्व जण मतदानाचा हक्क बजावणार आहात, तरी आपण सर्वांनी आपले मत भारतीय जनता पक्षाचे उरण येथील अधिकृत उमेदवार महेश बाल्दी आणि पेण येथील अधिकृत उमेदवार रविशेठ पाटील यांना मतदान करावे.
भारतीय जनता पक्षाच्या या दोन्ही उमेदवारांकडे उरण आणि पेणच्या विकासाचे धोरण आहे. त्यामुळे जर हे उमेदवार निवडून आले, तर निश्चितच उरण आणि पेणचा सर्वांगीण विकास होईल असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे आणि त्यामुळेच शेकापने पाठिंबा जाहीर करण्यात केला आहे.