श्यामा प्रसाद मुखर्जी बंदराच्या हाताळणीचे कंत्राट अदानी समुहाला

0

नवी दिल्ली – देशातील विमानतळे आणि बंदरे एका मागोमाग एक खिशात टाकण्याचा सपाटा लावलेल्या अदानी उद्योगसमुहाने आणखी एक बंदर खिशात टाकले आहे. कोलकाता येथील श्यामा प्रसाद मुखर्जी बंदराच्या हाताळणीचे कंत्राट अदानी समुहाला मिळाले आहे.

अदानी पोर्टस अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (एपीसेझ) ही अदानी समुहातील कंपनी आहे. या कंपनीला श्यामा प्रसाद मुखर्जी बंदर हाताळण्याचे ५ वर्षांसाठीचे कंत्राट मिळाले आहे. एपीसेझच्या वतीने ही माहिती देण्यात आली. करारानुसार कंपनीला बंदरात सामानाची हाताळणी करण्यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री आगामी सात महिन्यांच्या कालावधीत श्यामा प्रसाद मुखर्जी बंदरात उपलब्ध करून द्यावी लागणार आहे.

एपीसेझला श्यामा प्रसाद मुखर्जी बंदराचे व्यवस्थापन आणि मालाची हाताळण्याचे कंत्राट मिळाल्यामुळे आगामी कालावधीत व्हिझिंजाम आणि कोलंबो बंदरांशी जहाजांची वाहतूक सुलभ आणि जलदगतीने होईल,असा विश्वास कंपनीने प्रसिध्द केलेल्या निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech