बदलापूर घटनेचा ठाकरे गटाकडून सिंधुदुर्गात तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून मूक निषेध

0

सिंधुदुर्ग – बदलापूर येथे प्रशालेत शिकणाऱ्या ४ वर्षीय दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या निंदनीय घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी आज मालवण मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी व युवतीसेनेच्या फोवकांडा पिंपळ येथे आत्मक्लेश आंदोलन छेडण्यात आले. यावेळी राबविण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेत महिला व शाळा कॉलेजच्या विद्यार्थिनींनी स्वाक्षऱ्या करत या आंदोलनाला पाठिंबा दिला. बदलापूर येथे चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वच ठिकाणी ठाकरे गट शिवसेनेच्या माध्यमातून तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून मुक आंदोलन करण्यात आले. तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून शासनाच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला.

महिलांना सुरक्षा मिळत नसल्याबाबत व अत्याचारातील आरोपींना तात्काळ शिक्षा मिळत नसल्याबाबत यावेळी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, महिलांना सुरक्षा मिळालीच पाहिजे, पंधराशे रुपये नको… सुरक्षा द्या अशा घोषणा यावेळी सहभागी महिलांनी दिल्या.

बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज सावंतवाडी येथे ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून मुक आंदोलन करण्यात आले. येथील शिवसेना शाखा परिसरात हे आंदोलन करण्यात आले. तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून शासनाच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला. यावेळी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, तालुका संघटक मायकल डिसोजा, महिला आघाडी प्रमुख भारती कासार, उप तालुकाप्रमुख आबा सावंत, बाळा गावडे, विभाग प्रमुख सुनील गावडे, महिला आघाडी शहर संघटक श्रुतिका दळवी, कल्पना शिंदे, विनोद ठाकूर, बाळू गवस, अशोक धुरी आदी उपस्थित होते.

बदलापूर येथे झालेल्या लहान मुलींवरील अत्याचाराच्या निषेधार्थ वेंगुर्ला-दाभोली नाका येथे महाविकास आघाडीच्या वतीने तोंडावर काळ्या पट्ट्या लावून मुक आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, शहर प्रमुख अजित राऊळ, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ महिला संपर्क संघटक सुकन्या नरसुले, उपतालुका उमेश नाईक, अल्पसंख्यांक तालुका प्रमुख रफिक बेग, माजी उपनराध्यक्ष अस्मिता राऊळ, शैलेश परुळेकर, मकरंद गोंधळेकर, उपशाखाप्रमुख महादेव काजरेकर, स्वाती सावंत, जास्मिन फणसोपकर, अरुणा माडये, तुळस विभाग प्रमुख संदीप पेडणेकर, राष्ट्रीय काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश डिचोलकर आदी उपस्थित होते.

बदलापूर येथे चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध म्हणून आज कणकवलीत यावेळी तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून, आणि काळ्या फिती लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर शांततेच्या माध्यमातून घटनेचा निषेध करण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार न घडण्यासाठी कणकवली शहरात नाक्या नाक्यांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत ,महिला जिल्हा संघटक नीलम पालव ,युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, महिला तालुकाप्रमुख माधवी दळवी, प्रथमेश सावंत ,बाळू मेस्त्री, योगेश मुंज, सी आर चव्हाण, श्री गुडेकर,उत्तम लोके ,सचिन सावंत, आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

बदलापूर येथे चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर आज कुडाळमध्ये ठाकरे गट शिवसेनेच्या माध्यमातून शाखा कार्यालय येथे तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून मुक आंदोलन करण्यात आले. तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून शासनाच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला.यावेळी जिल्हा प्रमुख संजय पडते, उप जिल्हा प्रमुख अमरसेन सावंत, तालुका प्रमुख राजन नाईक, नगरसेवक उदय मांजरेकर, माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, शहर प्रमुख संतोष शिरसाट आदी उपस्थित होते.

आज वैभववाडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे देखील शिवसेना पदाधिकारी यांनी काळ्या फिती लाऊन बदलापूर घटनेचा निषेध व्यक्त केला. तसेच राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले. यावेळी नंदू शिंदे, लोके,संदीप सरवणकर, स्वप्नील धुरी, रोहित पावसकर, बाळा पाळये , रामदुल पाटणकर, जितू तळेकर इत्यादी पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech