सोलापूर : सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार फारुख शाब्दी यांच्या प्रचारसभेला खासदार असदुद्दीन ओवैसी आले होते. त्यावेळी इतरांचे भाषण सुरू असतानाच सोलापूर पोलिसांनी त्यांना स्टेजवरच नोटीस दिली. ओवैसी यांनी आपल्या भाषणात कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणार नाही अशी प्रक्षोभक भाषा वापरू करू नये अशी पोलिसांनी नोटीस दिली. भारतीय नागरिक संहिता कलम 168 प्रमाणे पोलिसांनी ही नोटीस दिल्याची माहिती आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी प्रक्षोभक भाषण करू नका अशा आशयाच्या नोटीस उमेदवारांना अनेकदा दिल्या जातात. पण त्या त्यांच्या घरी किंवा पक्ष कार्यालयात दिल्या जातात. सोलापुरात मात्र वेगळंच घडलं. एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांची सभा सुरू असतानाच, स्टेजवरच पोलिसांनी त्यांना नोटीस दिली. प्रक्षोभक भाषण करू नका अशा आशयाची ती नोटीस असल्याची माहिती आहे. खासदार ओवैसी यांना सोलापूर पोलिसांनी नोटीस दिल्यानंतर ती मराठीत असल्याचं त्यांना लक्षात आलं. त्यावेळी ओवैसी यांनी त्या नोटीसचा मोबाईलमध्ये फोटो काढला. नंतर त्या नोटीसची इंग्रजीत प्रत मागवली.