* महाराष्ट्रात आजपर्यंत एक कोटी १२ लक्ष प्राथमिक सदस्य
* १६ ते १९ फेब्रुवारीदरम्यान घर चलो अभियान
छत्रपती संभाजीनगर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढणार आहोत. तथापि, काही निर्णय स्थानिक परिस्थिती पाहून घेतले जातील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. ते छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमाशी बोलत होते. ते म्हणाले, अजून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते येतील आणि ज्या नेत्याला वाटतं की भाजपासोबत काम करायचं आहे ते नेते येतील, पक्ष प्रवेश सुरू आहेत. २०१४-१९ या काळात ज्या पद्धतीने आम्ही काम केलं, त्या पद्धतीचं काम आम्ही पूर्ण करू. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक आता भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत.
बावनकुळे सद्या संघटन पर्वासाठी महाराष्ट्राच्या प्रवासावर आहेत. त्यांनी विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राचा प्रवास पूर्ण केला असून, रविवारी कोल्हापूर, पुणे करून मंगळवारी ते कोकण, ठाणे व मुंबई विभागातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची कार्यशाळा घेणार आहेत. या प्रवासात प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण त्यांच्यासोबत आहेत. बावनकुळे हे सध्या संघटन पर्वासाठी महाराष्ट्राच्या प्रवासावर आहेत. त्यांनी विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राचा प्रवास पूर्ण केला असून, रविवारी कोल्हापूर, पुणे करून मंगळवारी ते कोकण, ठाणे व मुंबई विभागातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची कार्यशाळा घेणार आहेत. या प्रवासात प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण त्यांच्यासोबत आहेत.
महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत एक कोटी १२ लक्ष प्राथमिक सदस्य पक्षाचे झाले असून, २८ तारखेपर्यंत दीड कोटी सदस्य संख्या असलेली भाजपा आणि संपूर्ण डिजिटल रेकॉर्ड असलेली भाजपा ही पार्टी असेल असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त करून ते म्हणाले, देश व महाराष्ट्रच्या इतिहासातलं सर्वात मोठं संघटन पर्व आम्ही करतो आहे. ३ लक्ष कार्यकर्त्यांना आम्ही ऍक्टिव्ह मेंबरशिप देतो आहोत.
देशमुख हत्या प्रकरण गंभीर : बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरण गंभीर असून यावरून भाजपबाबत चुकीचे मत तयार करण्याचा काहींचा प्रयत्न होता. आम्ही राज्याला ज्या विकासाच्या मार्गावरून घेऊन जात आहोत त्यामध्येही अडथळा येत होता. नेत्यांमध्ये मतभेद असू शकतात पण मनभेद असता कामा नये. विकासाच्या मुद्द्यावर सर्वांनीच एकत्र येऊन काम करावे, यासाठी सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या आरोपींना शिक्षा होत नाही तोपर्यंत सरकार स्वस्थ बसणार नाही. तीच पार्टी म्हणून आम्भूचीही भूमिका आहे.
घर चलो अभियान : सद्या भाजपची सदस्य नोंदणी सुरु असून संघटन पर्वामध्ये दीड कोटी सदस्य संख्या असलेली भारतीय जनता पार्टी घर चलो अभियान देखील राबवित आहे. १६ ते १९ फेब्रुवारी दरम्यान हे राबवले जाईल. महाराष्ट्रामध्ये एक कोटी 12 लक्ष प्राथमिक सदस्य या पक्षाचे झाले आहेत
वाळू माफिया औषधालाही उरणार नाहीत..! : राज्यासाठी चांगले वाळू धोरण येत आहे आमची अंतिम बैठक पुढच्या आठवड्यात होणार असून त्यामध्ये धोरण निश्चित होईल. सर्वसामान्य जनतेला स्वस्त दरात वाळू मिळेल. यामुळे वाळू माफिया यापुढे तयारच होणारच नाही.