मुंबई – मल्याळम चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार मोहनलाल यांना कोची इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ताप, श्वास घेण्यात अडचण आणि स्नायूंच्या दुखण्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना ‘अमृता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’मध्ये दाखल करण्यात आलं होतं. आवश्यक त्या चाचण्या झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती ‘मनोरमा ऑनलाइन’ने दिली आहे. श्वास घ्यायला त्रास, स्नायूंचं दुखणं आणि ताप यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
डॉक्टरांनी त्यांना पूर्णवेळ आराम करण्याचा सल्ला दिला आहे. मोहनलाल यांना श्वासोच्छवासाचा संसर्ग झाला असावा, असं म्हणत डॉक्टरांनी त्यांना पाच दिवस पूर्णपणे आराम करण्यास सांगितलं आहे. मोहनलाल यांच्या प्रकृतीविषयी रुग्णालयाकडून माहितीसुद्धा देण्यात आली आहे. “मी 64 वर्षीय मोहनलाल यांच्यावर उपचार केले आहेत. त्यांना उच्च ताप, श्वास घेण्यास अडचण आणि मायल्जियाचा त्रास जाणवत होता. त्यांना श्वसनाशी संबंधित व्हायरल इन्फेक्शन झाल्याचा अंदाज आहे. त्यांना औषधं देण्यात आली असून पुढील पाच दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्याचप्रमाणे कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे”, अशी माहिती डॉ. गिरीश कुमार के. पी. यांनी दिली.