मिशन – अपक्ष उमेदवारांची जबाबदारी वडेट्टीवारांच्या खाद्यांवर
मुंबई : विदर्भात ६२ पैकी ३५ ते ४० जागा काँग्रेसला मिळतील, असा विश्वास नेत्यांकडून व्यक्त केला जात असला तरी काँग्रेस तसेच महाविकास आघाडीच्या वतीने अतिदक्षता तसेच नवनियुक्त आमदारांच्या हालचालीवर काँग्रेस नेत्यांकडून अचून आढावा घेतला जात आहे. या निकालाच्या पार्श्वभूमिवर कोणत्याही आमदारांकडून सोबतच निकालानंतर ऐनवेळी दगाफटका होऊ नये म्हणून विदर्भातील आमदारांसाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात येत आहे. गेल्या वेळेच्या तुलनेत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढल्याने महायुतीसोबतच महाविकास आघाडीतील नेत्यांचा सत्तेचा दावा केला जात आहे. राज्यात सरासरी ४ टक्क्यांहून अधिक मतदान वाढले आहे. सत्ताविरोधी भावना प्रबळ झाल्यास मतटक्का वाढतो, असा काँग्रेसचा दावा आहे.
विदर्भातील ६२ पैकी ३५ ते ४० जागा काँग्रेसला मिळतील, असा विश्वास नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. काँग्रेसच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न होऊ नये म्हणून आतापासूनच खबरदारी घेतली जात आहे. २३ नोव्हेंबरला निकाल समोर येताच आमदारांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच निवडून येण्याची शक्यता असलेल्या अपक्ष उमेदवारांच्या संपर्कात राहण्याची जबाबदारी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. वडेट्टीवार यांच्यावर पूर्व विदर्भातील आमदारांच्या व्यवस्थेचीही जबाबदारी आहे. यावेळी वडेट्टीवार बोलले की, विधानसभा निवडणुकीचा निकाल आमच्या बाजूने लागेल असा आम्हाला विश्वास आहे. महाविकास आघाडी १६५ ते १७० जागा जिंकू. आधीच्या महायुती सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात आक्रोश होता. त्यामुळे लोकांना बदल हवा आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी तोडफोड करून हे सरकार बनवलं होतं.
महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत निर्णय घेऊ घेतील. मात्र, माध्यमांनी प्रश्न विचारल्यामुळे संजय राऊत यांच्या तोंडून तसा शब्द निघाला असेल. मात्र, आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना मुख्यमंत्री व्हायचयं असं कधीच म्हटलेलं नाही, असं स्पष्टीकरण वडेट्टीवार यांनी दिलं. एक्झिट पोल हे एक्झॅक्ट पोल नसतात. त्यामुळे निकालाची वाट पाहावी. निकालात काय ते स्पष्ट होईल. मी यावर जास्त भाष्य करणार नाही. अशा कंपन्या काम करत असतात त्यांचे अंदाज वर्तवत असतात. महाविकास आघाडी महाराष्ट्रात १६५ जागा जिंकत आहे. दरम्यान नाना पटोले यांनी ते मुख्यमंत्री होणार असं कुठंही म्हटलेलं नाही.