श्रीलंका दौ-यासाठी टीम इंडियाची धुरा सूर्याकडे

0

कोलंबो – श्रीलंका दौ-यासाठी टीम इंडियाच्या शिलेदारांची निवड करण्यात आली आहे. वनडे संघाची धुरा सूर्यकुमार यादव याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. तर वनडेचे कर्णधारपद रोहित शर्मा याच्याकडेच असेल. महत्वाचे म्हणजे, वनडे आणि टी २० संघाचे उपकर्णधार शुभमन गिल याच्याकडे सोपवण्यात आले आहे. हार्दिक पांड्या याच्याकडून उपकर्णधारपद काढून घेण्यात आले आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये तीन सामन्याची वनडे आणि तीन सामन्याची टी २० मालिका होणार आहे. २७ जुलै ते ७ ऑगस्ट यादरम्यान टीम इंडिया श्रीलंकाविरोधात वनडे आणि टी २० मालिका खेळणार आहे. टी २० चे सर्व सामने पल्लेकेले येथे होणार आहेत, तर वनडे सामने कोलंबो येथील मैदानात होणार आहेत.

टी २० मालिकेसाठी टीम इंडिया :  सूर्यकुमार यादव(कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जायस्वाल, रिंकु सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज

वनडे मालिकेसाटी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर)ऋषभ पंत (विकेटकीपर),श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech