सुरक्षा दलाने घातला परिसराला वेढा
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये आज, रविवारी जिहादी दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात 10 जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. तसेच सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घालून दहशतवाद्यांचा शोध सुरू केलाय. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिहादीदहशतवाद्यांनी श्रीनगरच्या टीआरसीजवळील रविवारी बाजारपेठेत ग्रेनेड फेकले.या हल्ल्यात मिस्बा अमिन (वय 17. रा. नौगाम), अजान कालू (वय 17, रा. नुरबाग), हबीबुल्ला राथर (वय 50, बांदीपोरा), अल्ताफ अहमद सीर (वय 21, रा. शोपियां) फैजल अहमद (वय 16 रा. खानयार), उजेर फारूक भट, फैजान मुश्ताक (वय 20 रा. पंपोर), जाहिद वानी (वय 19 रा.नौगाम), गुलाम मुहम्मद सोफी वय 55 रा. छत्ताबल), सुमैया जान (वय 45 रा.नैदखाई, सुंबल) असे 10 जण जखमी झालेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेनंतर लगेचच हल्लेखोरांना पकडण्यासाठई सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला होता.
या हल्ल्याशी संबंधित अधिक माहिती गोळा करण्यासाठी तपास सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या हल्ल्यानंतर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले की, निष्पाप नागरिकांना लक्ष्य करून या प्रकारच्या हल्ल्याचे कोणतेही समर्थन होऊ शकत नाही. ही घटना चिंतेची बाब आहे. या हल्ल्यांची मालिका संपवण्यासाठी सुरक्षा दलांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, जेणेकरून लोक कोणत्याही भीतीशिवाय त्यांचे जीवन सामान्यपणे जगू शकतील. त्यांनी सुरक्षा यंत्रणेला या दिशेने काम करण्याचे आवाहन केले, जेणेकरून नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करता येईल. सर्व नागरिकांना शांततेत जगण्याचा अधिकार असून या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.