नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं

0

पालघर : सावत्र बापाने अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केल्यानं एका मुलीने त्याच्यावर चाकूने हल्ला करत त्याला जखमी केल्याची घटना नालासोपाऱ्यामध्ये घडली. या मुलीने तिच्या सावत्र बापाच्या गुप्तांगावर आणि संपूर्ण शरीरावर चाकूने वार केल्याने आरोपी गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नालासोपारा पूर्वच्या बावशेत पाढ़ा परिसरात ही घटना घडली आहे. सावत्र बापाने आपल्यासोबत दुष्कर्म करण्याचा प्रयत्न केला, त्याने अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्या मुलीने केला आहे. त्यामुळेच संतापलेल्या मुलीने चाकूने सावत्र बापाच्या शरीरावर आणि गुप्तांगावर वार करून त्याला रक्तबंबाळ केलं.

या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्या अल्पवयीन मुलीच्या हातात चाकू दिसत असून तिचा बाप समोर रक्तबंबाळ होऊन पडला आहे. यावेळी जमलेले नागरिक त्या मुलीला समजवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येतंय. तू हातातला चाकू फेकून दे, पोलिस तुला न्याय देतील असं त्या मुलीला सांगताना नागरिक दिसत आहेत. यानंतर त्या मुलीने चाकू फेकून दिला आणि नंतर जमलेल्या नागरिकांनी त्या आरोपी बापाला रुग्णालयात दाखल केलं.

नराधम बापाचे गुप्तांग कापले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी आणि मुलगी ही नालासोपारा पूर्वच्या संतोषभवन येथील सर्वोदय नगर चाळीत राहतात. या मुलीच्या आईचे आरोपी रमेश भारतीसोबत दुसरे लग्न आहे. आरोपी हा त्याच्या सावत्र मुलीवर शारीरिक संबंधासाठी दबाव टाकत होता. आताही तसाच प्रकार घडल्यानंतर मुलीने आरोपीवर चाकूने वार केला आणि त्याचे गुप्तांग कापले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी लगेच धाव घेतली आणि त्या मुलीला ताब्यात घेतले. सध्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून पुढील कारवाई केली जात आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech