अधिसंख्य पदावरील कर्मच्याऱ्यांची वेतन वाढ रोखणाऱ्या परिपत्रकाला स्थगिती
मुंबई – महाराष्ट्र राज्य प्रशासनाने राज्य सरकारने अधिसंख्या पदावरील कोळी समाजातील कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखून देण्यात आलेली वेतन वाढ वसूल करण्याचे परिपत्रक जारी केले होते. अखिल भारतीय कोळी समाज संघटनेने ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्वरित दाखल घेऊन सदर परिपत्रकाला स्थगिती दिली आहे.त्यामुळे अधिसंख्या पदावरील कोळी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य प्रशासनाने कोळी समाजातील अधिसंख्या पदावरील कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखण्याचा निर्णय दिनांक 7/5/2024 च्या परिपत्रकद्वारे घेण्यात आला होता. त्यामुळे कोळी समाजातील बहुसंख्य शासकीय कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार होता. या संदर्भात अखिल भारतीय कोळी समाज प्रदेशाध्यक्ष केदार लखेपुरीया , उपाध्यक्ष डी. एन. कोळी, महाराष्ट्र आणि सरचिटणीस अॅड सचिन ठाणेकर यानी पुढाकार घेत शिवसेना सरचिटणीस संजय मोरे यांची तात्काळ भेट घेवून सदर परिपत्रकासंदर्भात चर्चा करून कोळी समाजावरील अन्यायकारक परिपत्रक मागे घेण्यासंदर्भात मागणी केली.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सादर अन्यायकारक प्रिपत्रकाची कारवाई थांबवण्या संदर्भात मागणी करण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखील भारतीय कोळी समाज संघटनेने केलेल्या निवेदनानुसार सदर परिपत्रक स्थगित करण्याचे आदेश आदेश दिले होते. अखिल भारतीय कोळी समाज संघटनेने केलेल्या प्रयत्न मुळे प्रशासनाने आज सुधारित परिपत्रक काढून वेतन वाढ वसूल करण्याच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.
कोळी समाजातील कर्मचाऱ्यांना न्याय दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार अध्यक्ष केदार लखेपुरीया यांनी मानले असून कोळी कर्मचाऱ्यांनी आता सावध होणे गरजेचे असून भविष्यातील होऊ घातलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी तयार राहिले पाहिजे असे मत सरचिटणीस सचिन ठाणेकर यांनी व्यक्त केले आहे.
शब्दांकन – मंगेश तरोळे – पाटील