मुंबई – नियमबाह्य पद्धतीने मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून कारभार हाती घेणाऱ्या सुधाकर शिंदे यांची अखेरीस बदली झाली आहे. मात्र नियमबाह्य पदावर बसलेल्या अधिकाऱ्याने आठ महिन्यात घेतलेले निर्णय सरकार रद्द करणार का?हे देखील सरकारने स्पष्ट करावे असे म्हणत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
वडेट्टीवार म्हणाले की, नियमबाह्य पद्धतीने मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून कारभार हाती घेणाऱ्या सुधाकर शिंदे यांची अखेरीस बदली झाली आहे.याबाबत आम्ही सातत्याने पाठपुरावा केला होता.नोव्हेंबर २०२३ पुढे सुधाकर शिंदे यांना सेवेत वाढ देता येणार नाही हा स्पष्ट उल्लेख बदलीच्या आदेशात करण्यात आला आहे. त्यामुळे नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ या आठ महिन्यात सुधाकर शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयांची चौकशी झाली पाहिजे. वडेट्टीवार म्हणाले की , नियमबाह्य पदावर बसलेल्या अधिकाऱ्याने आठ महिन्यात घेतलेले निर्णय सरकार रद्द करणार का? हे देखील आता सरकारने स्पष्ट केले पाहिजे.