“तामिळनाडू दुसऱ्या भाषिक युद्धासाठी सज्जस”- एम.के. स्टॅलिन

0

चेन्नई : तामिळनाडू दुसऱ्या भाषि युद्धांसाठी सज्ज असल्याचा इशारा मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी आज, मंगळवारी दिला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर लोकसभा मतदारसंघाच्या सीमांकन मुद्द्यावर चर्चेसाठी ५ मार्च रोजी सर्वपक्षीय बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाषेच्या मुद्यावर स्टॅलिन म्हणाले की, दुसऱ्या भाषिक युद्धाची बिजे पेरली जात असून आम्ही त्यासाठी तयार आहेत. द्रमुकचा तीन भाषा धोरणाला विरोध आहे. तामिळनाडू तमिळ आणि इंग्रजी भाषेने समाधानी आहे. परंतु, भाजपप्रणित एनडीए सरकार हिंदी लादत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीवरून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून शाब्दिक युद्ध सुरू आहे. अलिकडेच, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्टॅलिन यांनी तामिळनाडूमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू करण्यास नकार दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्याच वेळी, स्टॅलिन केंद्र सरकारवर राज्यात जबरदस्तीने ते लागू करण्याचा आरोप करत आहेत. त्यांनी राज्यावर हिंदी लादल्याचा आरोप केला. परंतु, केंद्र सरकारने हा आरोप फेटाळून लावला आहे.

यावेळी स्‍टॅलिन म्‍हणाले की, तामिळनाडूला कुटुंब नियोजन कार्यक्रम यशस्वीरित्या राबवल्यामुळे लोकसभेतील ८ जागा गमावण्याचा धोका आहे. परिणामी तामिळनाडूच्या खासदारांची संख्या ३९ हून ३१ वर जण्याची भीती आहे. यासंदर्भात भारतीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्‍यासाठी राजकीय पक्षांना सर्वपक्षीय बैठकीसाठी आमंत्रित केले जाईल. राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहनही त्‍यांनी केले. राष्ट्रीय शिक्षण धोरण, केंद्रीय निधी आणि नीट सारख्या मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवण्यासाठी पुरेशा संख्येने खासदारांची आवश्यकता आहे, अशी अपेक्षाही त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech